ऑक्सफर्डच्या दोन पदव्या, 22 देशात काम; अफगाणचा मंत्री बनला डिलिव्हरी बॉय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऑक्सफर्डच्या दोन पदव्या, 22 देशात काम; अफगाणचा मंत्री बनला डिलिव्हरी बॉय

ऑक्सफर्डच्या दोन पदव्या, 22 देशात काम; अफगाणचा मंत्री बनला डिलिव्हरी बॉय

बर्लिन : तालिबानच्या भीतीने देश सोडून अधिक चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक नागरिक अफगाणिस्तान सोडून इतर देशांमध्ये आश्रयाला गेले आहेत. अफगाणिस्तानमध्ये त्यांचा सामाजिक दर्जा काहीही असला तरी इतर देशांमध्ये ‘निर्वासित’ हाच त्यांचा दर्जा आहे. जर्मनीमध्ये आलेल्या अफगाणिस्तानच्या एका माजी मंत्र्यालाही असाच अनुभव आला असून त्यांना सध्या ‘फूड डिलिव्हरी’चे काम करावे लागत आहे.

हेही वाचा: रकुल प्रीत, राणा दग्गुबातीला ड्रग्ज प्रकरणी ED कडून समन्स

हेही वाचा: सुटका मोहिमेची डेडलाईन पाळा; तालिबानने अमेरिकेला पुन्हा धमकावलं

सय्यद अहमद शाह सआदत असे त्यांचे नाव आहे. अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये २०१८ मध्ये माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. दोन वर्षे ही जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. डिसेंबर २०२० मध्ये ते जर्मनीत आले. तालिबानचे वर्चस्व वाढत असल्याचे पाहून त्यांनी देश सोडला होता. सध्या ते जर्मनीमधील लेपझिग येथे निर्वासित म्हणून रहात आहेत. पैशांची कमतरता भासू लागल्याने त्यांनी फूड डिलिव्हरी बॉयचे काम पत्करले आहे. ग्राहकाला पिझ्झा देण्यासाठी जात असतानाचे त्यांचे छायाचित्र एका स्थानिक पत्रकाराने काढले. हे त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाले आहे. ‘स्काय न्यूज अरेबिया’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सआदत यांनी व्हायरल झालेले छायाचित्र आपलेच असल्याचे मान्य केले. ‘‘काही दिवसांपूर्वी मी एका व्यक्तीला भेटलो. दोन वर्षांपूर्वी मी अफगाणिस्तानचा माहिती मंत्री होतो, असे त्याने मला सांगितले. जर्मनीत काय करता, असे विचारल्यावर फूड डिलीव्हरी करतो, असे त्या व्यक्तीने सांगितले,’ असे ट्विट संबंधित स्थानिक पत्रकाराने केले आहे.

उच्चविद्याविभूषित असतानाही...

सआदत यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन पदव्युत्तर पदव्या मिळविल्या आहेत. त्यांनी दळणवळण क्षेत्रातही अनेक वर्षे काम केले आहे. १३ देशांतील २० बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. जर्मनीत आल्यावर त्यांनी अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केले. जर्मन टेलिकॉम क्षेत्रात काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, त्यांना कोणत्याही कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नाही.

सध्या मी अत्यंत सामान्य जीवन जगत आहे. मला जर्मनीमध्ये सुरक्षित वाटते. माझ्या कुटुंबासह येथे मी आनंदी आहे. मला पैसे साठवून एखादा जर्मन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची इच्छा आहे, असं सय्यद अहमद शाह सआदत यांनी म्हटलंय.

Web Title: Syed Ahmad Shah Saadat Former Afghanistan Minister Now Works As Delivery Boy Spotted In Germany

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..