8 डिसेंबर 2024 रोजी सिरियात बंडखोरांनी सत्तापालट केला. अध्यक्ष बशर अल असाद यांना त्यांच्या कुटुंबासह देशातून पलायन करावे लागले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्याना मॉस्कोत आश्रय दिला. .ते वेळीच पळून गेले, बंडखोरांच्या हाती लागते, तर त्यांनी असाद व कुटुंबाला ठार केले असते अथवा अटक केली असती. दरम्यान, बंडखोरांचे नेते कमांडर अबु महंमद अल गोलानी यांनी दमास्कसमधील अयतिहासितक उमैद मशिदिच्या परिसरात जमलेल्या हजारो लोकांना उद्देशून सांगितले, की सिरियांच्या इतिहासात एक नवे पान लिहिले जात आहे. ``आता आपण नवा सिरिया स्थापन करू, जो या इस्लामी देशासाठी दीपस्तंभ असेल.’’.बंडखोरांनी असाद यांच्या महालात घुसून तेथील वस्तू लुटल्या, नासधूस केली. हाच कित्ता अलीकडे बांग्लादेशात (5 ऑगस्ट 2024) गिरविण्यात आला. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पलायन केल्यानतंर क्रांतिकारी तरूणांनी प्रथम त्यांच्या आलिशान निवासस्थानाला लक्ष्य केले. श्रीलंकेत माजी अध्यक्ष गोटबाया राजपक्षे यांचे सरकार जनतेने उलथून टाकले, (14 जुलै 2022) तेव्हाही जनता त्यांच्या अध्यक्षीय निवासस्थानात घुसली होती. .तशीच पुनरावृत्ती झाली ती अफगाणिस्तानात. तालिबानने तेथील सत्ता उलथवून टाकली, तेव्हा तालिबानच्या म्होरक्यांनी प्रथम कब्जा केला तो माजी अध्यक्ष अब्दुल घनी अहमदझाय यांच्या राजप्रासादावर (15 ऑगस्ट 2021) अलीकडील या चार घटनांपैकी एक मध्य आशियातील व अन्य तिन्ही घटना भारतीय उपखंडातील आहेत..``अति तेथे, माती अशी’’ म्हण आहे. तेच सिरियात झाले. असाद घराण्याची सत्ता तब्बल पन्नास वर्षे चालली. बशर अल असाद तब्बल 24 वर्षे ( 17 जुलै 2000 ते 8 डिसेंबर 2024) सत्तेवर होते. तत्पूर्वी त्यांचे वडील हाफेझ अल असाद 1971 पासून 2000 (त्यांच्या मृत्यूपर्यंत 29 वर्षे) सत्तेवर होते. या काळात सिरियात हुकूमशाही होती. .ते दोघेही अलावाईट या मुस्लिम पंथाचे. सिरियात या पंथ अल्पसंख्याक. पण सत्ता मात्र त्यांच्या हाती असल्याने गेली वीस वर्षे बशर अल असाद यांच्याविरूद्ध बंडखोरी चालली होती. या वेळी बंडखोरांनी हाफेझ अल असाद यांचे लटाकिया प्रांतातील कर्दाहा या त्यांच्या गावातील त्यांचे थ़डगेही पेटवून उद्ध्वस्त केले. असाद घराण्याची एकही खूण त्यांना सिरियात नको आहे. या घटनेतून एक गोष्ट सिद्ध होते, की बशर अल असाद आता कधीही सिरियात परतू शकणार नाही. बंडखोरांनी महमंद अल बशीर यांना पंतप्रधान पदी नेमले असून, कमांडर गोलानी यांच्या आदेशानुसार ते शासन करतील..असाद यांनी पलायन केल्यानंतर दमास्कस व अऩ्य शहरातून जनतेनं जो जल्लोष केला, त्यावरून सत्तांतराला किती प्रचंड पाठिंबा आहे, हे सिद्ध झाले. अबु महंमंद अल गोलानी हे हयात तहरीर अल-शाम या अतिरेकी गटाचे नेते. त्याला नुसरा आंघाडीची पार्श्वभूमी आहे. ही सुन्नी इस्लामी निमलष्करी राजकीय संघटना असून असाद यांच्या विरूद्ध गेली दोन दशक चाललेल्या नागरी युद्धात आघाडीवर आहे. सिरियाला असाद यांच्या सत्तेतून मुक्त करणे, हे तिचे ध्येय होते. ते आता साध्य झाले आहे..असाद यांचा बाथ पक्ष हा धर्मनिरपेक्ष होता. त्याचमुळे सिरियात ख्रिश्चन समाधानाने राहात होते. सुरक्षित होते. परंतु, ते सुरक्षा कवच किती राहाणार, हे सांगता येत नाही. इराकचे माजी अध्यक्ष कै सद्दाम हुसेन यांचा राजकीय पक्षही बाथ पक्ष होता. तो ही धर्मनिरपेक्ष. परंतु, सद्दाम हुसेन व बशर अल असाद यांचे कधीही मित्रत्वाचे संबंध नव्हते..सिरियात सत्तापालट घडवून आणण्याचे प्रयत्न अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, कतार या देशांतर्फे गेली 20 वर्षे चालले होते. या काळात इराकमध्ये सद्दाम हुसेन, लीबियात कर्नल गद्दाफी यांना अमेरिकेने केवळ पदच्यूत केले नाही. तर त्यांना ठार मारले. या देशात लोकशाहीचे रोपण होईल, अशी आशा अमेरिकेने निर्माण केली होती. .पण प्रत्यक्षात आज त्या दोन्ही देशात कमालीची राजकीय अस्थिरता आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या हाती सत्ता सोपवून अमेरिकेने काखा वर केल्या. दहशतवादाविरूद्ध लढा देण्याचे त्यांचे आश्वासन हवेत विरले. असाद यांच्या नंतर सिरियात लोकशाही येईल, याची काही खात्री नाही. केवळ इराण व ऱशियाच्या पाठिंब्यामुळे असाद अध्यक्षपदी टिकून राहिले होते. असाद यांच्या सत्तापालटामुळे अर्थातच रशिया व इराणचा तेथील प्रभाव संपुष्टात येणार आहे..2012 मध्ये सिरियात संसदीय निवडणुका झाल्या. त्यात अर्थातच असाद पुन्हा भारी मताने निवडून आले. कारण, त्यांच्याविरूद्ध कुणी उमेदावार नव्हता. दिल्लीतील पत्रकारांच्या गटाला असाद सरकारने निवडणूक प्रक्रिया पाहाण्यासाठी आमंत्रित केले होते. .मी त्या गटात होतो. आम्ही दमास्कसला पोहोचलो. विमानतळावरून शहराकडे जाताना दिसली, ती एका इमारतीच्या भिंतीवरील रशियन नेते जोसेफ स्टालिन, व्लादिमीर लेनिन व कार्ल मार्क्स यांची भव्य छायाचित्रे. लटाकिया प्रांतातील बंदर रशियाच्या हाती होते. तर पलमैरा या अयतिहासिक वारसा असलेल्या शहरात आयसीसने ठाण मांडले होते. नंतर आयसीसने ते शहर उद्धव्स्त केले..अमरिकेच्या त्या वेळच्या परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन त्या काळात बंडखोरांना चिथावण्या देत होत्या. असाद सरकारविरूदध लढण्यासाठी फ्रान्सने अत्याधुनिक हत्यारे बंडखोरांना पाठविली होती. कतारचे (त्यावेळेचे) पंतप्रधान शेख हमादबिन( जस्सीमबिन जाबेरबिन महंमदबिन) थानी अल थानी बंडखोरांना आर्थिक मदत पाठवित होते. .दमास्कसमध्ये अधुनमधून बाँब पडत होते. हिजबोल्लाचे माजी प्रमुख हसन नसरल्ला यांचे भव्य छायाचित्र शहरच्या प्रमुख चौकात लावलेले होते. नसरल्ला यांना 27 सप्टेंबर 2024 रोजी इस्त्राएलने लेबॅननमधील त्यांच्या कार्यालयावर बॉंब टाकून ठार मारले. त्यानंतर नेमलेले हिजबोल्ला कमांडर हाशेम सैफेद्दीन यांना महिन्याभरातच 8 ऑक्टोबर 2024 रोजी इस्त्राएने बेरूत येथील हल्ल्यात ठार केले..इस्त्राएल पॅलेस्टाईन संघर्षात पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्या हिजबोल्लाने असंख्य इराणी क्षेपणास्त्रांचा हल्ला इस्त्राएलवर अलीकडे केला होता. त्याचा वचपा इस्त्राएलने घेतल्याने आता हिजबोल्लाचे कंबरडे मोडले आहे. तसेच, असाद पदच्युत झाल्याने आजवर सिरियावर असलेला रशिया व इराणचा प्रभाव लौकरच संपुष्टात येणार आहे. हे सारे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, कतार व तुर्कस्तान या देशांच्या पथ्यावर पडणार आहे..सिरियातील नागरी युद्धाचा भयानक परिणाम तेथील जनतेवर वर्षानुवर्ष होत आहे. एकीकडे असाद यांच्या लष्कराचा जुलूम, दुसरीकडे बंडखोरांचे हल्ले व तिसरीकडे आयसीसची घुसखोरी व युद्ध या त्रिकोणात जनता अडकलेली होती. हजारो विरोधकाना असाद सरकारने तुरूंगात टाकले होतेस तर अनेकांना ठार केले होते. .त्यामुळे लाखोंना जीव मुठीत धरून स्थलांतर करावे लागले. त्यातील शरणार्थींची सर्वाधिक संख्या शेजारच्या तुर्कस्तानमध्ये असून उपलब्ध माहितीनुसार त्यांची संख्या सुमारे 32 लाख आहे. त्याव्यतिरिक्त सिरियन लेबॅनन, जर्मनी, इराक, इजिप्त, ऑस्ट्रिया, स्वीडन, नेदरलँड्स या देशात त्यांनी पलायन केले. .तुर्कस्तानचे दिल्लीतील माजी राजदूत बराक अकपार यांनी मला सांगितले होते, की त्यांच्यावर प्रचंड खर्च होत असून त्यासाठी 7 अब्ज डॉलर्सची गरज आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदत मिळत नाही. त्यामुळे तुर्कस्तानच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. शिवाय, त्यातील सुमारे पन्नास ते पंचाहत्तर लाख महिलांनी मुलांना तुर्कस्तानमधील छावण्यात जन्म दिला. त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न आहे..सिरियाहून शरणार्थींचे लोंढे गेली अनेक वर्षे युरोपात जात असल्याने तेथील श्वेतवर्णीय लोकसंख्येला इस्लामी दहशत वाढण्याचे भय वाटत आहे. ते कमी झालेले नाही. प्रश्न आहे, तो सत्तापालटानंतर सिरियन शरणार्थी मायदेशी परतणार काय. हा यक्षप्रश्न केवळ नव्या सिरियन नेत्यांसाठी नव्हे तर जगासाठी आव्हान ठरणार आहे..इस्त्राएलने गेल्या दोन दिवसात लेबॅनन येथील हिजबोल्लाच्या दारूगोळ्यांला नष्ट करण्यासाठी बाँबगोळ्यांचा वर्षावर चालविला आहे. त्यामुळे सिरिया, लेबॅनन, पॅलेस्टाईन, इस्त्राएल व मध्य आशिया येती अनेक वर्षे धगधगत राहाणार आहे, यात शंका नाही. अमेरिकेचे मनोनीत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, ``हे अमेरिकेचे युद्ध नव्हे. त्यात गुंतण्याचा इरादा नाही. लेट इट प्ले आउट’’ अशी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली असली, तरी त्यांना वा अमेरिकेला या जागतिक घटनेकडे डोळे मिटून राहाता येणार नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.