
अम्मान (जॉर्डन) (पीटीआय) : सीरियामध्ये असाद सरकार गेल्यानंतर राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या देशाच्या भवितव्याबाबत चर्चा करण्यासाठी जॉर्डनमध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. सर्व देशांनी आपापसांतील मतभेद विसरून सीरियातील राजकीय स्थित्यंतराला सर्वांनी पाठबळ द्यावे, असे संयुक्त निवेदन बैठकीनंतर प्रसिद्ध करण्यात आले.