
नवी दिल्लीः सीरियामध्ये मागच्या आठवड्यात ६ मार्च रोजी नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. सीरियाचे अंतरिम राष्ट्रपती अहमद अल-शरा (अबू मोहम्मद अल जुलानी) यांच्या सरकारचे HTS सुरक्षारक्षकांनी अलावी अल्पसंख्याक समूदायातील लाकांवर मोठी हिंसा केली आहे. असोसिएडेट प्रेसच्या रिपोर्टनुसार, सीरियामध्ये मागच्या चार दिवसांपासून हिंसा सुरु आहे. आतापर्यंत एक हजारपेक्षा जास्त लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय.