Syria : सीरियामध्ये असाद कुटुंबाची ५३ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. बंडखोरांनी दमस्कस ताब्यात घेतल्यानंतर इराण, रशिया, इस्राईल, आणि तुर्कीच्या भूमिकांवर परिणाम होईल.
५३ वर्षांपासून सीरियावर आपली पोलादी पकड ठेवणाऱ्या असाद कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली आहे. बंडखोरांनी राजधानी दमस्कसचा ताबा घेतला आहे. सीरियाच्या लष्कराने माघार घेतली असून, बाशर अल असाद अज्ञातस्थळी परागंदा झाले आहेत.