
USA-China Conflict : चीनच्या 68 विमानांसह, १३ युद्धनौकांनी ओलांडली मेडिअन लाईन
नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेच्या तैवानमधील हालचालींनंतर चीनचा संताप झाला असून तैवानवर युद्धाचे ढग घोंघवत आहेत. यापार्श्वभूमीवर चीनची ६८ लढाऊ विमानं, १३ युद्धनौकांनी मेडिअन लाईन ओलांडली आहे, असा दावा तैवानच्या संरक्ष मंत्रालयानं केला आहे. (Taiwan Defence ministry says 68 Chinese planes 13 warships crossed median line)
अधिकृत नसली तरी तैवान आणि चीन या दैशांना वेगळी करणारी रेषा म्हणजे मेडिअन लाईन. चीननं आपल्या हद्दीतून ही रेषा ओलांडत तैवानमध्ये लढाऊ विमानं आणि युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळं येत्या काळात संघर्ष वाढण्याची शक्यता असून युद्धाचे ढग घोंघावत आहे.
हेही वाचा: राऊतांचं ईडी कोठडीतून मित्रपक्षांना पत्र; पाठिंब्यासाठी मानले आभार
दरम्यान, अमेरिकनं संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी या मंगळवारी रात्री प्रत्यक्ष तैवानमध्ये दाखल झाल्या होत्या. तत्पूर्वी चीननं अमेरिकेला इशारा दिला होता की, जर पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यातर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पण अमेरिकेनं चीनचा हा इशारा धुडकावत पेलोसी यांनी तैवान दौऱ्यावर पाठवलं.
Web Title: Taiwan Defence Ministry Says 68 Chinese Planes 13 Warships Crossed Median Line
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..