काबूल: भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

taliban

काबूल: भारताच्या प्रकल्पांबाबत तालिबानची महत्त्वाची भूमिका

नवी दिल्ली: भारताचे अफगाणिस्तानात अनेक इन्फ्रास्ट्रक्चर (india project in afganistan) प्रकल्प सुरु आहेत. या संदर्भात तालिबानने अत्यंत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. भारताची इच्छा असेल, तर ते त्यांचे अपूर्ण इन्फ्रस्ट्रक्चर प्रकल्प पूर्ण करु शकतात, असे तालिबानचे (taliban) प्रवक्ते सुहैल शाहीन यांनी सांगितले. "आम्ही कुठल्याही दुसऱ्या देशाला किंवा गटाला आपल्या भुमीचा दुसऱ्या देशाविरोधात वापर करु देणार नाही. हे स्पष्ट आहे. भारताने इथे अनेक प्रकल्प उभे केले आहेत. काही बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प सुरु आहेत. लोकांसाठी हे सर्व प्रकल्प असल्याने ते त्यांनी पूर्ण करावेत" असे सुहैल शाहीन यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

नवी दिल्लीने तालिबान बरोबर चर्चा सुरु केल्याचे संकेत दिले आहेत. पण अजून तालिबानला अधिकृतपणे मान्यता दिलेली नाही. अफगाणिस्तानच्या 34 प्रांतामधील विकास प्रकल्पावर काम करणाऱ्या सर्व प्रोफेशन्लसना भारताने माघारी बोलावले आहे. भारताची अफगाणिस्तानात एकूण तीन अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.

हेही वाचा: विमानातून पडून अफगाणिस्तानच्या फूटबॉलपटूचा मृत्यू

शातूत धरण, सलमा धरण हे महत्त्वाचे प्रोजेक्टस आहेत. अफगाणिस्तानची संसद भारतानेच बांधून दिली असून तिथे महत्त्वाचे रस्ते सुद्धा बांधले आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यात भारताची काही भूमिका नसेल. त्या प्रकल्पाच्या संरक्षणाची जबाबदारी अफगाणि जनतेवर असेल, असे मागच्या आठवड्यात परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

Web Title: Taliban Asks India To Finish Infrastructure Projects

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..