तालिबानच्या हल्ल्यात 30 सैनिक ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 20 जून 2018

काबूलः अफगणिस्तानमधील पश्चिम प्रांतात असलेल्या बदघीस भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 30 अफगाणी सैनिक ठार झाले आहेत, अशी माहिती प्रांताच्या राज्यपालांनी आज (बुधवार) दिली. ईद अल्-फित्रच्या सुट्टीनंतर मोठा हल्ला झाला आहे.

प्रांताचे राज्यपाल अब्दुल कफूर मलिकझई यांनी सांगितले की, 'तालिबानी दहशतवाद्यांनी दोन सुरक्षा चौक्यांवर आज पहाटे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये 30 सैनिक ठार झाले असून, अनेकजण जखमी झाले आहेत. तालिबानने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.'

दरम्यान, बदघीस प्रांतामध्ये मंगळवारी (ता. 19) रात्री सैनिकांनी केलेल्या कारवाईत 15 दहशतवादी ठार झाले होते.

Web Title: Taliban Kill 30 Afghan Soldiers