esakal | पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा
sakal

बोलून बातमी शोधा

पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा

पंजशीरमध्ये रक्तरंजित युद्ध! 700 तालिबान्यांचा खात्मा

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अफगाणिस्तानच्या पंजशीरमध्ये शनिवारी तालिबान आणि नॅशनल रेझिस्टन्स यांच्यात रक्तरंजित युद्ध झालं. तालिबानने पंजशीरवर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. तर पंजशीरमधील सालेह यांनी 700 तालिबान्यांचा खात्मा केला असून एक हजार पेक्षा जास्त तालिबानी कैदेत असल्याचा दावा केला आहे. पंजशीर प्रांताची राजधानी बझारकमध्ये घुसल्याचा दावा तालिबानने केला आहे. नॅशनल रेझिस्टन्स यांनी असा दावा केलाय की, तालिबानी दहशतवाद्यांना कपिसा प्रांत आणि पंजशीरच्या सीमेवर परत ढकलले गेले आहेत. पजंशीरचा नेता अहमद मसूद म्हणाले होते की, ‘मरायला तयार आहे. पण आत्मसमर्पण करणार नाही’

तालिबानचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट करत म्हटलेय की, पंजशीरमधील दोन जिल्ह्यांना ताब्यात घेतलं आहे. पंजशीरमधील सातपैकी चार जिल्ह्यांवर कब्जा मिळवला आहे. उर्वरीत भागावर कब्जा मिळवण्यासाठी आगेकूच केली आहे. पंजशीरमधील एका योद्ध्याने सोशल मीडियावर असाही दावा केलाय की, खवाक पासमध्ये हजारो दहशतवाद्यांना वेढले आहे आणि तालिबानने दश्ते रेवक परिसरात वाहने आणि उपकरणे सोडून दिली आहेत. युद्धात तालिबान्यांचं मोठं नुकसान झालेय. इथून तालिबान्यांनी पळ काढला आहे. अनेकांचा मृत्यु झाला तर काहींना कैद करण्यात आलेय.

पंजशीरची भौगोलिक रचना कशी आहे ?

पंजशीर एक निर्सगरम्य खोरं आहे. अफगाणिस्तानच्या ३४ प्रांतापैकी हा एक प्रांत आहे. पंजशीर सात जिल्ह्यांमध्ये विखुरलेले असून इथेत ५१२ गावं आहेत. २०२१ च्या जनगणनेनुसार, पंजशीरची लोकसंख्या १ लाख ७३ हजार आहे. बाझारक ही या प्रांताची राजधानी आहे.

पंजशीर किल्ला

१९७०-८० च्या दशकात सोविएत फौजांनी अफगाणिस्तानवर आक्रमण केले होते. पण त्यांना पंजशीर मिळवता आले नाही. पुन्हा एकदा पंजशीर तालिबान विरोधाचे मुख्य केंद्र बनू शकते. नॉर्दन अलायन्ससाठी पुन्हा एकदा स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची, संघटना मजबूत करण्याची हीच संधी आहे. नॉर्दन अलायन्सचा वेगळा झेंडा असून पंजशीरमध्ये तो डौलाने फडकत आहे. नॉर्दन अलायन्स एक लष्करी आघाडी आहे. तालिबान सारखेच इथे सुद्धा योद्धे आहेत. तालिबान विरोधात लढण्यासाठी हा अलायन्स आकाराला आला. इराण, भारत, तजाकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांकडून नॉर्दन अलायन्सला मदत आणि बळ मिळाले. १९९६ ते २००१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. त्यावेळी नॉर्दन अलायन्सनेच त्यांना संपूर्ण अफगाणिस्तानवर वर्चस्व मिळवण्यापासून रोखले होते.

loading image
go to top