esakal | 20 वर्षांत हजारो ग्रॅज्युएट, पण आमच्या कामाचे नाहीत - तालिबान | Afghanistan
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban

गेल्या २० वर्षात ग्रॅज्युएट झालेली मुलं आमच्या काही कामाची नाहीत असं तालिबानचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे.

20 वर्षांत हजारो ग्रॅज्युएट, पण आमच्या कामाचे नाहीत - तालिबान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानने सुरुवातीला महिलांना सरकारमध्ये संधी देऊ यांसारखी आश्वासने दिली. मात्र नंतर त्यांनी रंग बदलला असून महिलांना फक्त तीच कामे करता येतील जी पुरुष करत नाहीत. आता गेल्या २० वर्षात ग्रॅज्युएट झालेली मुलं आमच्या काही कामाची नाहीत असं तालिबानचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी म्हटलं आहे. काबुल विद्यापीठात प्राध्यापकांसोबतच्या बैठकीवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काळजीवाहू शिक्षणमंत्री असलेल्या अब्दुल वाकी हक्कानी यांनी म्हटलं की, २० वर्षांच्या कालावधीत कॉलेज आणि विद्यापाीठातून जे काही ग्रॅज्युएट झाले त्यांच्यासाठी आमच्याकडे काही काम नाही. अफगाणिस्तानमधील TOLO न्यूजसह स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. हक्कानी यांनी धार्मिक शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचं म्हटलं. मदरसा आणि इतर धार्मिक संस्थांनांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यापीठात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीएचडी विद्यार्थ्यांची पात्रता जास्त नाही असेही हक्कानी म्हणले.

हेही वाचा: संवाहकांचा शोध लावणाऱ्यांना ‘नोबेल’

गेल्या २० वर्षात अफगाणिस्तानमध्ये चांगलं शिक्षण मिळालं. मुलं आणि मुलींना आधुनिक शिक्षण मिळावं यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली. अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. याशिवाय विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात शिक्षणाची दारे उघडली. मात्र आता तालिबानने ताबा मिळवल्यानंतर पुन्हा शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. मुलींना मुलांसोबत एका वर्गात बसून शिकता येणार नाही असा आदेश तालिबानने दिला आहे.

अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथवून लावली होती. अमेरिकेच्या मदतीने हामिद करझाई यांचे सरकार स्थापन झाले होते. मात्र अमेरिकेने सैन्य मागे बोलावताच तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे.

loading image
go to top