

Tanzania
esakal
पूर्व आफ्रिकेतील महत्त्वाचा देश असलेल्या टांझानियाकडे विपुल नैसर्गिक संसाधने, कृषी क्षमता आणि हिंदी महासागर किनाऱ्यावरील महत्त्वाचे भौगोलिक स्थान आहे. दार-एस-सलाम बंदरामुळे हा देश पूर्व आणि मध्य आफ्रिकेच्या व्यापाराचे प्रवेशद्वार आहे. भारत-टांझानियामध्ये ऐतिहासिक व्यापारसंबंध, भारतीय वंशीय समुदायाची उपस्थिती आणि औषधनिर्मिती, शिक्षण, ऊर्जा व कृषी क्षेत्रातील वाढते सहकार्य यामुळे संबंध अधिक दृढ होत आहेत.