
बिल गेट्स -मेलिंडा घटस्फोटावर तस्लिमा नसरीन म्हणतात...
मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असणाऱ्या बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स (bill-and-melinda-gates) यांनी लग्नानंतर २७ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करत यापुढे आम्ही दोघं एकत्र राहू शकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या पत्रकानंतर संपूर्ण जगभरात या घटस्फोटाची चर्चा रंगली. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण या मुद्द्यावर व्यक्त झाला. त्यानंतर आता सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन व्यक्त झाल्या आहेत. तस्लिमा नसरीन (taslima-nasrin) यांनी मेलिंडाला टोला लगावला आहे. (taslima-nasrin-statement-on-bill-and-melinda-gates-divorce)
"मला असं वाटतं आपल्या मुलांना कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती मिळावी यासाठी मेलिंडाने घटस्फोटाची मागणी केली असावी. आपल्या तीनही मुलांना केवळ ३० मिलिअन डॉलर्सची संपत्ती देणार असल्याचं बिल गेट्स यांनी जाहीर केलं होतं. काही लोक हे स्वार्थी असतात, त्यामुळे ते केवळ स्वत: चा विचार करतात. तर, काही जण नि:स्वार्थपणे इतरांचा विचार करतात", असं ट्विट तस्लिमा नसरीन यांनी केलं आहे.
दरम्यान, बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाविषयी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक जणांनी या घटस्फोटामागे बिल गेट्स यांच्या प्रेयसीला जबाबदार ठरवलं आहे. बिल गेट्स व मेलिंडा यांची पहिली भेट १९८७ मध्ये झाली होती. त्यावेळी मेलिंडा मायक्रोसॉफ्टमध्ये प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. त्यानंतर १९९४ मध्ये या दोघांनी हवाईच्या लानी बेटावर लग्न केले होते. असं म्हणतात की, तेथील गर्दी कमी करण्यासाठी त्यांनी बरीच हेलिकॉप्टर भाडे तत्वावर घेतली होती. बिल गेट्स हे पूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचे ते मालक होते.