Taylor Swift's Cat : जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये टेलर स्विफ्टची मांजर Olivia; संपत्ती ऐकून बसेल धक्का! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Taylor Swift's Cat

Taylor Swift's Cat : जगातील श्रीमंत प्राण्यांमध्ये टेलर स्विफ्टची मांजर Olivia; संपत्ती ऐकून बसेल धक्का!

तुम्ही आजपर्यंत सर्वात श्रीमंत लोकांची यादी जाहीर झाल्याचं ऐकल असेल. जगात आतापर्यंत सर्वात श्रीमंत लोक यांच्या याद्या जाहीर झाल्या आहेत. परंतु जगात सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांची यादी आता समोर आली आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेतील हॉलिवूड गायिका टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सन ही जगभरातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑलिव्हिया बेन्सन या मांजरीची संपत्ती ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ऑलिव्हिया बेन्सन कोट्यधीश आहे. टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया 97 मिलियन डॉलर म्हणजे सुमारे 800 कोटीची मालकीण आहे. टेलर 2014 पासून ऑलिव्हियाचे संगोपन करत आहे. ऑलिव्हियाशिवाय, टेलरकडे मेरीडिथ ग्रे आणि बेंजामिन बटन या आणखी दोन मांजरी आहेत.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

पॉप स्टार टेलर स्विफ्टची मांजर ऑलिव्हिया बेन्सन जगातील सर्वात श्रीमंत प्राण्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. टेलर स्विफ्टसोबत तिची लाडकी मांजर ऑलिव्हिया बेन्सन अनेक म्युझिक व्हिडीओ आणि जाहिरातींमध्ये दिसून येते. ऑलिव्हिया मांजर सध्या 97 दशलक्ष डॉलर संपत्तीची मालकीण आहे.

हेही वाचा: सुदानमध्ये शांततेसाठी भारतीय महिला जवान

ऑलिव्हियापेक्षाही श्रीमंत यादीत कोण?

गुंथर IV (Gunther VI) नावाचा कुत्रा जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राणी आहे. गुंथर IV हा जर्मन शेफर्ड जातीचा कुत्रा आहे. गुंतर 500 मिलियन डॉलर संपत्तीचा मालक आहे.

तर नाला नावाची मांजर जगातील सर्वात श्रीमंत पाळीव प्राण्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. नाला जगातील सर्वात श्रीमंत मांजर आहे. नाला सोशल मीडियावरील जाहिरातींमधून पैसे देखील कमावते. नाला सियामी पर्शियन जातीची मांजर आहे. नालाची संपत्ती 100 दशलक्ष डॉलर इतकी आहे. तर नालाचे इंस्टाग्रामवर 4.4 दशलक्ष फॉलोअर्स असून इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारी पहिली मांजर आहे. नालाचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे.

हेही वाचा: Jeff Bezos: कर्माची फळं! कर्मचाऱ्यांना काढलं अन् पब्लिकनं दाखवला इंगा; जेफ बेझोसनं गमावले 1 बिलियन डॉलर

टॅग्स :Cat