चांगले गुण देण्यासाठी विद्यार्थिनींशी संबंध ठेवायचा शिक्षक; आता खातोय तुरुंगाची हवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

चांगले गुण देण्यासाठी विद्यार्थिनींशी संबंध ठेवायचा शिक्षक

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते प्रवित्र समजले जाते. परंतु, अनेकवेळा अशी प्रकरणे जगाच्या कानाकोपऱ्यातून समोर येतात जेव्हा या नात्याला काळिमा फासला जातो. असेच एक प्रकरण चर्चेत आले आहे. हसन विद्यापीठातील प्राध्यापकाने विद्यार्थिनींना परीक्षेत चांगले गुण देण्यासाठी संबंध (Teachers relationship with students) निर्माण केले. यानंतर प्राध्यापकाला तुरुंगात (Sent to prison) पाठवण्यात आले. ही घटना आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये घडली.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाल्यानंतर ही बाब समोर आली. ही बातमी समजताच एकच खळबळ उडाली. विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने हे चॅट सार्वजनिक केले होते. हळूहळू हे प्रकरण पसरले आणि याची माहिती विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचली.

हेही वाचा: अल्पवयीन मुलगी प्रियकरासोबत पळाली अन् एक वर्षाच्या बाळासह सापडली

यानंतर प्रशासनाने प्राध्यापकावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. इथे ही बाब इतकी मोठी झाली की लोक रस्त्यावर उतरले. दरम्यान, इतर विद्यार्थिनींनीही आरोप केला. त्यानंतर याच विद्यापीठातील इतर प्राध्यापकांचीही नावे समोर आली. पाच प्राध्यापकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पाच प्राध्यापकांचा समावेश

यापैकी एका प्राध्यापकाला (Physical contact) असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचारासाठी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. या प्रकरणी आणखी ४ प्राध्यापक न्यायालयात हजर व्हायचे असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Teachers Relationship With Students Physical Contact Sent To Prison Crime News Africa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..