किशोरवयातील धूम्रपान घातक; कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधन

वृत्तसंस्था
Tuesday, 12 January 2021

वयाच्या १८ व्या वर्षाआधीच तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा ई - सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्यास अशा व्यक्ती भविष्यात दररोज धूम्रपान करण्याची शक्यता जास्त असते, असे अमेरिकेतील एका नव्या संशोधनात आढळले आहे.

लॉस एंजलिस -  जगभरात तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. वयाच्या १८ व्या वर्षाआधीच तंबाखूजन्य पदार्थांचे किंवा ई - सिगारेट ओढण्यास सुरुवात केल्यास अशा व्यक्ती भविष्यात दररोज धूम्रपान करण्याची शक्यता जास्त असते, असे अमेरिकेतील एका नव्या संशोधनात आढळले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले. ‘पेडियाट्रिक्स या नियतकालिकात संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग (एनआयडीए) आणि तंबाखूजन्य उत्पादनांसाठीच्या अन्न व औषध केंद्राने (एफडीए) हे सर्वेक्षण केले.  अमेरिकेतील नागरिकांमधील तंबाखूचा वापर व त्याचा परिणाम या सर्वेक्षणातून तपासण्यात आला. निकोटिनवरील अवंलबित्व वाढल्यावर सिगारेटच्या सेवनाचेही प्रमाण वाढत असल्याचे संशोधकांना जाणवले.    २०१४ मध्ये १२ ते २४ या वयोगटातील ई-सिगारेट्सचा वापर करणाऱ्या व्यक्तींना पुढील काळात दैनंदिन धूम्रपान करण्याची शक्यता अधिक असल्याचे संशोधकांना आढळले. त्याचप्रमाणे, वाढत्या वयाबरोबर त्यांचे तंबाखूचे सेवनही वाढले. या व्यक्तींमधील १८ ते २१ वयामध्ये दररोज धूम्रपान करण्याचे प्रमाण दुप्पट म्हणजे १२ टक्के झाले. तर २५ ते २८ वयोगटात ते २१ टक्के झाले. संशोधकांनी ‘पॉप्युलेशन ॲसेसमेंट ऑफ तोबॅकू ॲंड हेल्थ’ या सर्वेक्षणाचे विश्लेषण केले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
कसे केले संशोधन?
संशोधकांनी २०१३ आणि २०१४ मध्ये १२ ते २४ वयोगटातील मुले व तरुणांना सहभागी केले. त्यानंतर, तंबाखू व इतर १२ तंबाखूजन्य उत्पादनांचे दैनंदिन सेवन तपासण्यासाठी त्यांच्याकडून चार वर्षे माहिती जमविण्यात आली. पहिल्या वर्षी ४५ टक्के सहभागींनी पुढील आयुष्यात किमान एक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाची इच्छा व्यक्त केली. चौथ्या वर्षी सहभागींचे वय वाढल्यानंतर हीच टक्केवारी ६२ वर पोचली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्यसन कमी करण्यासाठी ई - सिगारेटकडे पाहिले जाते. मात्र,  ई-सिगारेट हे दररोज सिगारेट ओढण्याचे प्रवेशद्वारच असल्याचे समोर आले. तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे १८ व्या वर्षांपूर्वीच सेवन केल्यास पुढे दररोज सिगारेटची शक्यताही वाढते.
- प्रा. जॉन पिअर्स, कॅलिफोर्निया विद्यापीठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teenagers smoking is dangerous Research from the University of California