स्पेन-पोर्तुगाल तोडणार युरोपातील तापमानाचे रेकॉर्ड ?

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

स्पेनचे सध्याचे तापमान 47.3 अंश सेल्सिअस आणि पोर्तुगालचे तापमान 47.4 सेल्सिअसवर गेले आहे. तसेच युरोपातील सध्याचे तापमान 48 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तसेच यापूर्वी अॅथेन्स, ग्रीसमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद जुलै 1977 मध्ये करण्यात आली होती.  

नवी दिल्ली : युरोपात सर्वाधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात युरोपातील स्पेन आणि पोर्तुगालमधील तापमान 48-50 अंश सेल्सियसवर गेले होते. त्यानंतर आता युरोपातील स्पेन आणि पोर्तुगाल सर्वात जास्त तापमान असलेला भाग बनण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे.

हवामानमापन यंत्रांकडून या भागातील इबेरियन पेनिनसुलात तापमानाची मोजणी केली जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणात उष्णता जाणत आहे. उत्तर आफ्रिकेच्या दिशेने गरम हवेचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येणार असल्याने या भागात उष्णतेचा मारा होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या भागातील तापमान 48 पेक्षा अधिक झाले तर मागील 41 वर्षांपासून रेकॉर्ड तोडला जाण्याची शक्यता आहे. 

स्पेनचे सध्याचे तापमान 47.3 अंश सेल्सिअस आणि पोर्तुगालचे तापमान 47.4 सेल्सिअसवर गेले आहे. तसेच युरोपातील सध्याचे तापमान 48 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. तसेच यापूर्वी अॅथेन्स, ग्रीसमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद जुलै 1977 मध्ये करण्यात आली होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Temperatures in Spain and Portugal could exceed 48 degrees breaking all time Europe record