Indonesia : इंडोनेशियात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हल्ल्यात 10 जण जागीच ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indonesia Terrorist Attack

'केकेबी' या दहशतवादी गटानं जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले आहेत.

Indonesia : इंडोनेशियात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; हल्ल्यात 10 जण जागीच ठार

जकार्ता : इंडोनेशियामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Indonesia Terrorist Attack) 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय. तसंच या हल्ल्यात दोन जण जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या पूर्वेकडील प्रांत पापुआच्या (Papua) नडुगामध्ये हा हल्ला झालाय. पोलिसांनी (Indonesia Police) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एका फुटीरतावादी गटानं हा हल्ला केलाय.

या हल्ल्याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, 'केकेबी' या दहशतवादी (KKB Terrorists) गटानं जिल्ह्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांनी एका ट्रकवर हल्ला करून 20 जणांना लक्ष केलंय. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यात सुमारे 10 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा: PM मोदींनी 296 किमी लांबीच्या Bundelkhand Expressway चं केलं उद्घाटन

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, केकेबी दहशतवादी गटानं केलेला हा हिंसक हल्ला मानला जातोय. या हल्ल्याबाबत पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, शनिवारच्या हल्ल्यांचं नेतृत्व इजियानस कागोया या दहशतवादी गटानं केलं होतं. हा गट पापुआ प्रांतात सक्रियपणे कार्यरत असलेल्या सात फुटीरतावादी गटांपैकी एक आहे. या घटनेपासून पोलीस आणि लष्कर दहशतवादी गटाशी संबंधित लोकांचा शोध घेत आहेत. कागोया गटानं यापूर्वीही अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत.

Web Title: Ten Killed Two Injured In Terrorist Attack In Papua Indonesia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..