जर्मनीला रशियाचे जशास तसे उत्तर; पुतीन सरकारचा मोठा निर्णय | Russia and Germany | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Vladimir Putin

रशिया आणि जर्मनी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर रशियाने जर्मनीला जशास तसे उत्तर दिले आहे.

जर्मनीला रशियाचे जशास तसे उत्तर; पुतीन सरकारचा मोठा निर्णय

मॉस्को - जर्मनीच्या (Germany) एका न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी झालेल्या हत्या प्रकरणासाठी रशियाला (Russia) जबाबदार ठरवलं होतं. त्यानतंर जर्मनीने त्यांच्या देशातून दोन रशियन राजदूतांना काढलं होतं. यामुळे रशिया आणि जर्मनी यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर रशियाने जर्मनीला जशास तसे उत्तर दिले आहे. पुतीन (Vladimir Putin) सरकारने जर्मनीच्या दोन राजदूतांना देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

रशियाने बर्लीन न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना आरोप फेटाळून लावले होते. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत सोमवारी जर्मनीच्या राजदूतांना कल्पना दिली होती. ज्यामुळे राजदूतांना हटवण्याची माहिती देता येईल.

रशियाने राजदूतांना हटवण्याचं हे पाऊल जर्मनीने घेतलेल्या निर्णयाला प्रत्युत्तर असल्याचं म्हटलं आहे. रशियाने इशारा दिला की, रशिया जर्मनीकडून करण्यात येणाऱ्या कोणत्याही कृतीला किंवा निर्णयाला त्याच भाषेत उत्तर देईल आणि उत्तर देताना मागे पुढे पाहणार नाही.

हेही वाचा: White House वर नव्या पाहुण्याचं आगमन; बायडेन दाम्पत्याने केलं स्वागत

जर्मनीतील एका न्यायालयाने बुधवारी ५६ वर्षीय वादिम क्रॅसिकोव्हला एका व्यक्तीच्या हत्ये प्रकऱणी दोषी ठरवलं. चेचन वंशांच्या जॉर्जियन नागरिकाची त्याने हत्या केली होती. न्यायालयाने म्हटलं की, क्रॅसिकोव्हने रशियन संघाच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही हत्या केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर जर्मनीने रशियाच्या दोन राजदूतांना देशातून काढून टाकलं होतं.

Web Title: Tension Between Russia And Germany Moscow Ordered To Leave Russia For Two German Diplomats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RussiaGermany
go to top