भारत-पाक दरम्यानचा तणाव निवळला : डोनाल्ड ट्रम्प

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जेवढा तणाव होता, तो आता कमी झाला आहे.

वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंधांवरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे वक्तव्य केले आहे. गेल्या दोन आठवड्यात या दोन्ही देशांमधील तणाव निवळल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात फ्रान्समध्ये झालेल्या जी-7 परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली होती. यावेळी या दोघांमध्ये काश्मीरच्या मुद्दयावरून चर्चा झाली होती. त्यानंतर आता ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी होत आहे. दोन्ही शेजारी देशांना आवश्यक वाटल्यास आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या कोणत्याही मुद्द्यावर तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसल्याचे मोदींनी यापूर्वीच स्पष्ट केलेले आहे.

सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, की काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु दोन आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये जेवढा तणाव होता, तो आता कमी झाला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tensions between India, Pakistan less heated now than 2 weeks ago says Donald Trump