पाकिस्तानात आतापर्यंत झालेले दहशतवादी हल्ले

यूएनआय
Tuesday, 30 June 2020

दहशतवादाला जन्माला घालून पोसणाऱ्या पाकिस्तानला सुमारे २० वर्षांत मोठ्या प्रमाणात दहशतवादाला तोंड द्यावे लागले. दोन महिन्यांपूर्वीच पाकिस्तानने गुपचूपपणे हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांच्या यादीतून १८०० जणांची नावे वगळली होती. यामध्ये २००८ मधील दहशतवादी हल्ल्यातील संशयित, लष्करे तैयबाच्या झकी ऊर रेहमानचाही समावेश आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

२०१५ -
३० जानेवारी -
 दक्षिण पाकिस्तानातील शिकारपूरमधील शिया मशिदीवरील आत्मघाती बाँबहल्ल्यात ६१ जणांचा बळी. 
१३ मे : कराचीवर झालेल्या इस्लामिक स्टेट ग्रुपच्या पहिल्या हल्ल्यात ४५ शिया मुस्लिम ठार. 

२०१६ -
२७ मार्च -
 लाहोरमधील पार्कजवळील ख्रिश्चनांना लक्ष्य करून घडवलेल्या स्फोटात ७५ मृत, शेकडो जखमी. 
८ ऑगस्ट - क्वेट्ट्यातील रुग्णालयाला लक्ष्य करून हल्ला, ७३ जणांचा बळी. 
१७ सप्टेंबर - पाकिस्तानच्या आदिवासी भागात तालिबानींनी घडवलेल्या स्फोटात ३६ मृत. 
२५ ऑक्टोबर - बलुचिस्तानातील क्वेट्टा शहरातील पोलिस अकादमीत आत्मघातकी पथकाच्या हल्ल्यात ५९ मृत. 

२०१७ -
१६ फेब्रुवारी -
 शेहवान येथील लाल शहाबाज कलंदर दर्ग्याजवळील हल्ल्यात ८८ ठार आणि २५० जखमी.

२०१८ -
१३ जुलै -
 बलुचिस्तान विधिमंडळाच्या निवडणुकीवेळी झालेल्या स्फोटामध्ये १३१ ठार
२५ जुलै - क्वेट्टामधील निवडणुकीवेळी बाँबस्फोटात ३१ ठार. 

पाकिस्तानात २०१८ मधील २६२ दहशतवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांसह ५९५ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये किरकोळ स्वरूपाचे हल्ले झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist attacks in Pakistan so far