

Cyber Security
sakal
वॉशिंग्टन : जगभरात अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात ‘एआय’चा वापर वाढत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा चुकीच्या गोष्टींसाठीही वापर होण्याची भीती तज्ज्ञांना सतावते. दहशतवादी संघटना ‘एआय’ तंत्रज्ञानाबरोबर प्रयोग करत आहेत. या संघटनांसाठी नवीन सदस्यांची भरती, खऱ्या प्रतिमांसारख्या भासणाऱ्या डीपफेक प्रतिमा तयार करणे आणि सायबरहल्ल्यांसाठी ‘एआय’ शक्तीशाली साधन ठरू शकते, असा इशारा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर संस्थांनी दिला आहे.