दहशतवादी संघटनांना रसद नकोच - भारत

पीटीआय
Friday, 11 October 2019

दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करणाऱ्या देशांचा भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निषेध केला. या वेळी भारताच्या टीकेचा रोख पाकिस्तानवर होता.

न्यूयॉर्क - दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिक मदत करणाऱ्या देशांचा भारताने आज संयुक्त राष्ट्रांच्या सभेत निषेध केला. या वेळी भारताच्या टीकेचा रोख पाकिस्तानवर होता. 

आंतरराष्ट्रीय दहशतवाद नष्ट करण्यासाठीच्या उपायांबाबत आज आमसभेच्या सहाव्या समितीमध्ये चर्चा झाली. या वेळी भारताचे प्रतिनिधी येडला उमाशंकर यांनी दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक सहकार्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

‘काही देश दहशतवादी संघटनांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे आर्थिक सहकार्य करतात. या पैशांचा वापर करून दहशतवादी विविध ठिकाणी हल्ले घडवून आणतात. अशा प्रकारची मदत करणाऱ्या देशांचा निषेध करणे आणि त्यांच्यावर वचक बसविणे आवश्‍यक आहे. यासाठी संयुक्त राष्ट्र आणि फायनान्शिअल ॲक्‍शन टास्क फोर्स या संस्थेने अधिक समन्वयाने काम करायला हवे. इतर देशांनीही दहशतवादाविरोधात एकमेकांमधील सहकार्य वाढवायला हवे,’’ असे उमाशंकर या वेळी म्हणाले. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद याला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्याच्या सील केलेल्या बॅंक खात्यातून पैसे काढण्याची परवानगी सुरक्षा समितीने दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर भारताने वरील भूमिका मांडली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Terrorist organizations do not want logistics india