Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk Twitter Deal

ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर जनरल मोटर्सनं (General Motors) मोठं पाऊल उचललंय.

Elon Musk ला मोठा धक्का! 'जनरल मोटर्स'नं ट्विटरवरील जाहिरातींबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Elon Musk Twitter Deal : टेस्ला कंपनीचे सीईओ इलॉन मस्क (Tesla CEO Elon Musk) आता मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरचेही मालक बनले आहेत. त्यांनी शुक्रवारी ट्विटरची कमान हाती घेतली. ट्विटरची कमान हाती घेतल्यानंतर जनरल मोटर्सनं (General Motors) मोठं पाऊल उचललंय.

जनरल मोटर्सनं ट्विटरवरील जाहिरातींना (Twitter Advertising) तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिकन मीडियानं (American Media) ही माहिती दिलीय. टेस्लाचा सहयोगी असलेल्या डेट्रॉईट ऑटोमेकरनं (Detroit Automakers) शुक्रवारी सांगितलं की, ते प्लॅटफॉर्म कसं बदलेल याबद्दल ट्विटरशी बोलत आहे.

हेही वाचा: Meta : नोकरी वाचवायची असेल तर 200 टक्के मेहनत करा, अन्यथा कायमचं घरी जा; झुकेरबर्गचा थेट इशारा

याबाबत जनरल मोटर्सनं सांगितलं की, शक्य तितक्या काळासाठी ट्विटरवरील जाहिराती तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. जनरल मोटर्सचे (GM) प्रवक्ते डेव्हिड बर्नास म्हणाले, आम्ही नवीन मालकी अंतर्गत प्लॅटफॉर्म (Twitter) समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कंपनीचे महत्त्वाचे बदल आणि त्यांचे नवीन नियम समजेपर्यंत आम्ही आमची सशुल्क जाहिरात तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतलाय. डेव्हिड बर्नास म्हणाले, 'ट्विटरवर आमचे ग्राहकांशी संभाषण सुरूच राहील.'

हेही वाचा: डोनाल्ड ट्रम्प, कंगना रणौत सारखी लाखो बंद ट्विटर खाती पुन्हा सुरु होणार? Elon Musk नं दिलं स्पष्ट उत्तर

इलॉन मस्कनं सीईओ पराग अग्रवाल यांना हटवलं!

इलॉन मस्क यांनी शुक्रवारी ट्विटरची सूत्रं हाती घेताच कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि विजया गड्डे यांच्यासह कंपनीच्या चार उच्च अधिकाऱ्यांना हटवलं. इलॉन मस्कनं ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेतलं. इलॉन मस्क यांनी या करारानंतर ट्विटरमध्ये बदल करण्यास सुरुवात केलीय. त्यांनी म्हटलंय, की 'त्यांना ट्विटरला एक असं व्यासपीठ बनवायचं आहे, जिथं लोक हिंसा आणि द्वेषाशिवाय एकमेकांशी बोलू शकतील.'

टॅग्स :TwitterElon MuskTesla