'जर मी रहस्यमय परिस्थितीत मरण पावलो...'; मस्कच्या ट्वीटने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

elon musk

'जर मी रहस्यमय परिस्थितीत मरण पावलो...'; मस्कच्या ट्वीटने खळबळ

नवी दिल्ली : टेस्लाचे मालक आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी आपल्या ट्वीटरवर अकाउंटवरुन ट्वीट केलं आहे. सध्या त्यांच्या या ट्वीटमुळे खळबळ उडाली आहे.

त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीलंय की, "जर मी गूढ पद्धतीने मरण पावलो तर ते ऐकून छान वाटेल नाही का?" या त्यांच्या ट्वीटची सध्या चर्चा चालू आहे. दरम्यान त्यांनी काही दिवासांपूर्वी ट्वीटर विकत घेतल्याची घोषणी केली आहे. त्यानंतर त्यांच्या अशा आशयाच्या ट्वीटने खळबळ उडाली आहे.

दरम्यान हे ट्वीट करण्याअगोदर त्यांनी अजून एक ट्वीट केलं आहे ज्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये झालेल्या संभाषणाचा आशय आहे. "तुम्ही युक्रेनमधील सैन्याला लष्करी मदत पुरवत आहात आणि यासाठी एलॉन तुम्हाला जबाबदार धरण्यात येणार आहे." असं संभाषण असल्याचं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यानंतर लगेच त्यांनी मी गूढ पद्धतीने मरण पावलो तर हे ऐकायला छान वाटेल. असं ट्वीट केलं आहे.

दरम्यान त्यांनी ट्वीट केलेल्या संभाषणामध्ये युक्रेन सैन्याला अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयातून लष्करी मदत पुरवण्यात आली आहे असा आरोप केला असून मस्क यांनी रशियाच्या अशा धमक्यांचा सामना करावा लागत आहे.

त्यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या असून काहींनी त्यांच्या या ट्वीटवर ते दारुच्या नशेत असताना हे ट्वीट केलं असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.

Web Title: Tesla Owner Elon Musk Twit Viral If I Die

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :TwitterElon Musk
go to top