
अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ
अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) बंदुकधाऱ्याने काही नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ माजली आहे. या घटनेनं सध्या टेक्सासमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं समजतंय. अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेल्या ज्यू सिनेगॉगमध्ये घुसून एका बंदूकधाऱ्याने अनेकांना ओलीस ठेवले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कथित बंदूकधारी व्यक्तीने स्वतःची ओळख मुहम्मद सिद्दीकी अशी दिली आहे. ओलीस ठेवलेल्यांपैकी एकाची सुटका करण्यात यश मिळाल्याची देखील माहिती समोर आली आहे. (Texas Synagogue Hostage)
हेही वाचा: रेल्वे रूळांवर पडले होते Amazon, FedEx चे पार्सल; चोरट्यांनी मारला डल्ला पाहा व्हिडिओ
अमेरिकेतील माध्यामांनी दिलेल्या बातम्यांनुसार, तो स्वत: ला एफबीआय एजंटच्या हत्येप्रकरणी 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या आफिया सिद्दीकीचा भाऊ असल्याचे सांगत आहे. तरी एफबीआयने म्हटले आहे की, त्यांना अद्याप बंदूकधारी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पुष्टी केलेली नाही. इमारतीत किती लोक आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, बंदुकधारी हा आफियाचा भाऊ नसल्याचं स्पष्टीकरण आफियाच्या भावाच्या वकिलांनी दिलं आहे. वकिलाने सांगितले की, त्यांचे अशील सुरक्षा यंत्रणांना फोन करत आहेत आणि त्यांना सांगत आहेत की या संपूर्ण घटनेत त्यांचा सहभाग नाही.
हेही वाचा: पाकच्या सुरक्षा धोरणाकडे दुर्लक्ष नको
बायडेन सतत सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी ट्विट करून राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना घडामोडींची माहिती दिल्याचं सांगितलं आहे. साकी यांनी एका ट्विटमध्ये म्हटलं आहे की, त्यांची वरिष्ठ टीम बायडेनला माहिती देत राहील. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे अनेक वरिष्ठ सदस्य संस्थांच्या ते सतत संपर्कात आहेत.
Web Title: Texas Synagogue Hostage Situation Updates Man Takes Hostages Police In Stand Off Us President Joe Biden
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..