
थोडक्यात :
थायलंडमध्ये विलावन अमसावत नावाच्या महिलेला बौद्ध भिक्षूंना लैंगिक संबंधांसाठी भुरळ घालून ब्लॅकमेल करून 100 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी अटक.
पोलिसांना तिच्या फोनवर 80,000 फोटो आणि व्हिडिओ सापडले, ज्याचा वापर ती भिक्षूंना ब्लॅकमेल करण्यासाठी करत होती.
या घोटाळ्यामुळे नऊ भिक्षूंना भिक्षूत्वातून काढून टाकण्यात आले आणि थायलंडच्या बौद्ध संस्थेला मोठा धक्का बसला.
थायलंडमध्ये एका मोठ्या सेक्स स्कँडलचा पर्दाफाश झाला आहे. येथे एका महिलेला अनेक भिक्षूंसोबत सेक्स केल्याच्या आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. लैंगिक आमिष दाखवून आणि नंतर ब्लॅकमेल करुन सुमारे ३८५ दशलक्ष बाथ खंडणी उकळल्याचे वृत्त आहे. ही रक्कम भारतीय चलनात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.