एका नागरिकाला घेऊन विमान रोमानियाला परतले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान

एका नागरिकाला घेऊन विमान रोमानियाला परतले

बुखारेस्ट: काबूल विमानतळावरून आपल्या देशवासियांची सुटका करण्यासाठी गेलेले रोमानियाचे सी-१३० हर्क्युलस हे लष्करी विमान केवळ एका नागरिकाला घेऊन आज मायदेशी परतले. काबूलमध्ये प्रचंड गोंधळाची स्थिती असल्याने रोमानियाच्या इतर नागरिकांबरोबर ऐनवेळी संपर्क होऊ न शकला नाही.

त्यामुळे त्यांना न घेताच विमानाला परतावे लागले. रोमानियातून विमानाने उड्डाण करतेवेळी एकूण ३३ नागरिकांना काबूल विमानतळावरून परत आणण्याचे नियोजन होते. विमान काबूलमध्ये पोहोचले, मात्र एका नागरिकाव्यतिरिक्त इतर कोणीही विमानतळापर्यंत पोहोचू शकले नाही. या उर्वरित जणांना आणण्यासाठी विमानाची आणखी एक फेरी केली जाणार आहे.

हेही वाचा: Booster Dose: काय असतो बूस्टर डोस? तो कधी द्यावा लागतो?

‘ईयू’चे १०६ कर्मचारी परतले ब्रुसेल्स :

अफगाणिस्तानात काम करणाऱ्या युरोपीय महासंघाच्या (ईयू) १०६ कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुखरुप परत आणल्याचे ‘ईयू’ने सांगितले. अद्यापही ३०० जण काबूलमध्ये अडकून पडले असल्याचेही ‘ईयू’चे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेफ बोरेल यांनी सांगितले. हे ३०० जण अफगाणी नागरिक असून त्यांनी ‘ईयू’साठी काम केले आहे. ते विमानतळापर्यंत पोहोचण्याची आम्ही वाट पहात आहोत, अशी माहिती बोरेल यांनी दिली.

Web Title: The Plane Returned To Romania With A Civilian

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :airoplan