आता आपला नकाशा करा अपडेट; जगात चार नव्हे, तर पाच महासागर

map
mapgoogle

नवी दिल्ली : आपल्याला सर्वांना भूगोल (geography) हा विषय होता. त्यामध्ये पृथ्वीचा ७५ टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, तर या पृथ्वीवर किती महासागर (ocean in world) आहेत, याबाबत सर्वांनाच माहिती आहे. आतापर्यंत चार महासागर आहेत, असेच आपण शिकत आलोत. पण, आता आपल्याला आपला नकाशा अपडेट करण्याची गरज आहे. कारण, आता फक्त चार नाहीतर पाच महासागर (fifth ocean in wordl) आहेत. नॅशनल जिओग्राफीने (national geography) म्हटले आहे की, अंटार्क्टिकाजवळील 'दक्षिण महासागर' (south ocean) हा जगातील पाचवा महासागर आहे. (the wolrd has now fifth ocean recognized by national geography)

map
पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत विक्रमी वाढ

गेल्या ८ जूनला जागतिक महासागर दिवस होता. याच दिवसाच्या निमित्ताने या पाचव्या महासागराबद्दलची घोषणा करण्यात आली. गेल्या १९१५ ला आपल्या जगाचा नकाशा तयार करण्यात आला. यामध्ये अटलांटीक, पॅसिफिक, हिंदी आणि अर्टीक हे चार महासागर दाखविण्यात आले होते. मात्र, आता नॅशनल जिओग्राफीने या नव्या महासागराला मान्यता दिली आहे. कार्टोग्राफरने सांगितले की, हा महासागर कठिण परिस्थितीत तयार झाला आहे. तीन कोटी वर्षांपूर्वी जेव्हा अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिका एकमेकांपासून विभक्त झाले होते तेव्हा याची निर्मिती झाली होती. हा महासागर अंटार्क्टिका किनाऱ्याच्या दक्षिणेस 60 अंश दक्षिणेस आहे. त्याखालील क्षेत्र अमेरिकेच्या दुप्पट आहे. अमेरिकेच्या जियोग्राफिक नेम्स बोर्डाने 1999 पासून 'दक्षिण महासागर' हे नाव वापरले आहे. फेब्रुवारी महिन्यात National Oceanic and Atmospheric Administration याला मान्यता दिली होती. आता नॅशनल जिओग्राफीने पाचवा महासागर म्हणून मान्यता दिली आहे.

दक्षिण समुद्रात वेगळे आणि नाजूक जलचर आढळतात. जिथे वेल, पेंग्विन आणि सील्स सारखे प्राणी राहतात. हे प्राणी याच महासागरात आढळतात, तसेच या महासागरात हजारो प्रजाती आहेत. अशा परिस्थितीत संरक्षणाची गरज आहे. त्यामुळे या महासागराला स्वतंत्र ओळख देणे गरजेचे आहे, असे नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर एनरिक साला (National Geographic Explorer Enrique Sala) यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com