
Elon Musk : ...तेव्हा मी सीईओ पदाचा राजीनामा देईल; इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली - ट्विटरची खरेदी केल्यापासून उद्योजक इलॉन मस्क चर्चेत आहेत. मस्क यांनी ट्विटरची धुरा सांभाळल्यापासून अनेक बदल केले आहेत. मात्र त्यातच त्यांनी आपण ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक अट घातली आहे. त्यांनी ट्विट करून अशी माहिती दिली. (Elon Musk news in Marathi)
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, नोकरी घेण्याइतपत वेडा कोणी भेटला की मी सीईओ पदाचा राजीनामा देईन! त्यानंतर, मी फक्त सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमसोबत करेल, असंही ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी मस्क यांनी मी ट्विटरच्या सीईओपदावर राहु की नको, असा पोल घेतला होता. त्यात ५७ टक्के लोकांनी पद सोडा अस मत नोंदवलं होतं.
हेही वाचा: मोबाईलचा अतिवापर घातक! ‘ही’ पंचसूत्री पाळा, मुले पुन्हा हाती घेणार नाहीत मोबाईल
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेतल्यानंतर अनेक धक्कादायक निर्णय घेतले जात आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी मस्क यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अनेकांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. मस्कच्या या निर्णयाविरोधात जगभरातून टीकेची झोड उठली होती. कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या निर्णयानंतर आता पुन्हा मस्क एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारील असल्याचे सांगितले जात आहे.