जगातील हे आहेत दानशूर; ज्यांनी दिली कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी मदत

Coronavirus
Coronavirus

कोरोना विषाणूच्या संसर्गाने आतापर्यंत जगात अडीच लाख लोकांचा बळी घेतला असून, बाधितांची संख्या कित्येक लाख आहे. या संकटाने जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली आहे. या काळात अनेक मोठे उद्योगपती मदतीसाठी धावून आले आहेत. केवळ संपत्तीने नव्हे तर मनानेही मोठ्या मनाचे असल्याचे या अब्जाधीशांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या दानशूरपणामुळे वेगवेगळ्या देशांच्या सरकारांना कोव्हिड-१९ संकटाशी लढा देण्यासाठी मदत झाली आहे; परंतु सर्वच उद्योजक कोरोना संकटात मदतीसाठी पुढे आलेले नाहीत, हेही तेवढेच सत्य आहे.

7517 कोटी
ट्विटरचे सिईओ जॅक डार्सी यांनी कोविड संकटासाठी सर्वात जास्त मदत केली आहे.

1975 कोटी
जगात सर्वाधिक निकेल, प्लॅटिनम, तांब्याच्या खाणींचे मालक असलेले रशियाचे ब्लादिमीर पोटॅनिन यांच्याकडून मदत देण्‍यात आली.

1897 कोटी
टिकटॉक
कोविड संकटाशी लढण्यासाठी देणगी दिली.

1892 कोटी
मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्स यांनी कोरोना चाचणी, विलगीकरण आणि उपचारांसाठी देणगी दिली.

1210 कोटी
अँड्य्रू फॉरेस्ट  फोर्टेस्कू मेटल्स उद्योगसमूहाचे मालक

1000 कोटी
अझीम प्रेमजी विप्रो फाऊंडेशनच्या माध्यमातून मदत

757 कोटी
डेल टेक्नालॉजीच्या मायकल डेल आणि त्यांच्या पत्नीकडून मदत

557 कोटी 
डेल टेक्नालॉजीचे जेफ स्कोल व लॉस एंजलिस येथील अब्जाधीश

514 कोटी
झारा या जगप्रसिद्ध फॅशन ब्रॅंडचे संस्थापक ॲमेसिवो ओर्टेगा यांच्याकडून व्हेंटिलेटर, मास्क आणि किट्‌सची खरेदी

431 कोटी
पॅट्रिक मोट्‌सपेम, खाणसम्राट यांच्याकडून 
पाणीपुरवठा, वैद्यकीय सुविधेसाठी निधी दिला आहे.

302 कोटी
मायकेल ब्लूमबर्ग
आफ्रिका आणि गरीब देशांना निधी

227 कोटी
नेटफ्लिक्‍सचे री रिड हेस्टिंग आणि त्यांच्या पत्नीकडून मदत

227 कोटी
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग व पत्नी प्रिसिला चॅन यांच्याकडून  मदत

189 कोटी 
स्टीव्ह बामर
मायक्रोसॉफ्टचे माजी कार्यकारी अधिकारी

189 कोटी
अमेझॉनचे जेफ बेझोस यांच्याकडून डिलिव्हरी करणाऱ्या कामगारांना मदत

166 कोटी
डेव्हिड टेपर अमेरिकेतील हेज फंज मॅनेजमेंट व्यावसायिक

106 कोटी
अलिबाबाचे जॅक मा यांच्याकडून
कोरोना चाचणी, पीपीई किट्‌स, मास्क उपलब्ध करून देण्यासाठी मदत

106 कोटी
अपोलो ग्लोबलचे लियॉन ब्लॅक यांच्याकडून न्यूयॉर्कच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत 

75 कोटी 
फिल नाईट सहसंस्थापक, नाईके शूज कंपनी

75 कोटी 
ओफ्रा विन्फ्रे 
अमेरिका आणि आफ्रिकेतील गरिबांना जेवण देण्यासाठी निधीचा वापर

45 कोटी
बियॉन्से, लोकप्रिय गायिका
जन्मगावी मोफत कोव्हिड चाचणी सुविधा. मानसिक स्थिती बिघडलेल्यांना मदत

9 कोटी
जे के रोलिंग स्टोन 
हॅरी पॉटरच्या लेखिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com