फक्त लोकांना मिठी मारुन ती कमावते तासाला ७,३०० रुपये

फक्त लोकांना मिठी मारुन ती कमावते तासाला ७,३०० रुपये

तिच्या आपुलकीच्या मिठीसाठी लोक मोजतात लाखो रुपये

जगभरात पोटापाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर नोकरी, व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे प्रत्येक जण काही ना काही नोकरी करतच असतो. मात्र, जगभरात चित्रविचित्र काम करणाऱ्यांचीही काही कमी नाही. सध्या शिकागोमधील अशाच एका महिलेची चर्चा रंगली आहे. या महिलेच्या बिझनेसविषयी ऐकलंत तर नक्कीच तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. शिकागोमध्ये राहणारी एक महिला केवळ लोकांना मिठी मारुन लाखो रुपये कमावते. विशेष म्हणजे तिच्या एका तासाची फी देखील अचंबित करणारी आहे. (this-professional-cuddler-earns-rs-7300-per-hour-her-job-entails-some-strange-requests)

आपल्या जीवनात असे असंख्य प्रसंग घडत असतात ज्यावेळी आपल्याला मानसिक आधारासोबतच भावनिक आधाराचीही गरज असते. परंतु, आपलं दु:ख शेअर करायला किंवा आपलं म्हणणं ऐकून घ्यायला त्यावेळी आपल्या जवळ कोणीच नसतं. त्यामुळेच लोकांच्या या समस्येवर शिकागोमधील किली शॉपी या महिलेने तोडगा काढला आहे. हे महिला लोकांना भावनिक आधार देते, त्यांचं सांत्वन करते आणि त्यांना आपुलकीची मिठी मारते.

 फक्त लोकांना मिठी मारुन ती कमावते तासाला ७,३०० रुपये
वीजेच्या खांबावर चढला अस्वल; तारांमध्ये गुरफटला अन्...

किली शॉपी ही महिला प्रोफेशनल कडलर ( professional cuddler) असून त्या अपघात किंवा आघात झालेल्या व्यक्ती, मानसिक खच्चीकरण झालेल्या व्यक्ती यांच्याशी संवाद साधतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात आणि त्यांनी प्रेमाची, आपुलकीची मिठी मारतात. विशेष म्हणजे ज्यांच्या घरात असे आजारी किंवा आघात झालेले व्यक्ती आहेत, त्यांच्यावर प्रेमाने ट्रेंटमेंट करण्यासाठी खास किली यांनी बोलावलं जातं. त्यामुळेच किली एका तासाला ७.३०० रुपये इतकं मानधन घेतात.

"मी एक नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, माझी कार्यपद्धती चालते. कोणीही मनमर्जीप्रमाणे माझ्याशी वागू शकत नाही.किंबहुना मी तसं वागुही देत नाही. जे माझ्या नियमांमध्ये येत तेच मी करते. तसंच मी प्रत्येक वेळी पेशंट किंवा त्याच्या घरातील म्हणतील त्याला होकार देत नाही. प्रथम मी त्या गोष्टीची सत्यता पडताळते. जर मला योग्य वाटलं तरच मी पुढे पाऊल टाकते. तसंच ही एक प्रकारची थेरपीच आहे", असं किली म्हणाली.

 फक्त लोकांना मिठी मारुन ती कमावते तासाला ७,३०० रुपये
'सजीवसृष्टी नष्ट होण्यामागे एलियन ठरतील कारण'

पुढे ती म्हणते, "माझ्या कामात कोणतेच गैरव्यवहार होत नाहीत. मी नागरिकांसोबत गप्पा मारते, त्यांना पुस्तक वाचून दाखवते, त्यांना हसवते. त्या लोकांचा जास्तीत जास्त वेळ कसा चांगला जाईल याकडे माझं लक्ष असतं."

दरम्यान, 'हे काम करत असतांना किली यांना वेगवेगळे अनुभव आले. अनेकदा नागरिकांनी त्यांच्याकडे सेक्शुअल फेव्हरही केलं आहे. मात्र, अशा लोकांचं प्रमाण फार कमी असतं', असं किली म्हणतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com