क्रिकेटर झाला फौजी, झाला लष्करात भरती

वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

श्रीलंकेचा अष्टपैलू थिसारा परेरा श्रीलंकेच्या सैन्यात मेजर म्हणून रुजू झाला आहे. त्याने स्वत:च्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 

कोलंबो : श्रीलंकेचा अष्टपैलू थिसारा परेरा श्रीलंकेच्या सैन्यात मेजर म्हणून रुजू झाला आहे. त्याने स्वत:च्या ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 

''लष्कराचे लेफन्टंट जनरल शवेंद्र सिल्व्हा यांचे निमंत्रण स्वीकारुन मी लष्करात भरती झालो आहे. त्यांच्याकडून मला निमंत्रण येणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सर, तुमचे मनापासून आभार. मी लष्करासाठी काम करण्यास उत्सुक आहे,'' असे ट्विट त्याने केले आहे.

तो गजाबा रेजिमेंटमध्ये लष्कराच्या व्हॉलेंटिअर फोर्समध्ये मेजर म्हणून रुजू झाला आहे. यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंडीमलसुद्धा लष्कराच्या क्रिकेट संघात खेळण्यासाठी लष्करात रुजू झाला आहे. त्यामुळे आता हे दोघेही लष्कराच्या संघातून एकत्र खेळताना दिसतील. परेराने श्रीलंकेकडून 6 कसोटी, 161 एकदिवसीय आणि 70 टी20 सामने खेळले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thisara Perera Joins Sri Lanka Army In Gajaba Regiment