रेल्वेला धडकून तीन जणांचा मृत्यू 

पीटीआय
मंगळवार, 19 जून 2018

दक्षिण लंडनमध्ये रेल्वेला धडकल्याने तीन जण मरण पावले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले, की या अपघाताबद्दल त्यांना लॉघबोरो स्थानकातून फोन आला.

लंडन : दक्षिण लंडनमध्ये रेल्वेला धडकल्याने तीन जण मरण पावले. मात्र पोलिसांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी सांगितले, की या अपघाताबद्दल त्यांना लॉघबोरो स्थानकातून फोन आला.

पोलिसांना सकाळी साडेसहाच्या दरम्यान दूरध्वनी आला होता. पोलिस घटनास्थळी पोचले तेव्हा तीन जण मरण पावले होते. येथे नक्की काय घडले याबद्दल आमचे पथक तपास करीत आहे. ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिसचे गॅरी रिचर्डसन म्हणाले, की येथे नक्की काय घडले आणि या तीन जणांनी रेल्वेखाली कसे मरण पावले, याचा शोध घेतला जात आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three people die in the train accident