बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासाजवळ पुन्हा हल्ला; 5 रॉकेट हल्ले

वृत्तसंस्था
सोमवार, 27 जानेवारी 2020

नुकतेच बगदादमधील ग्रीन झोन येथील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत.

बगदाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप मिटलेला दिसत नसून, इराकची राजधानी बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट डागून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बगदादमधील अमेरिकेच्या दुतावासाजवळ पाच रॉकेट हल्ले करण्यात आले. रविवारी रात्री हे हल्ले झाले असून, या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. अद्याप कोणीही याची जबाबदारी घेतलेली नाही. इंटरनॅशनल झोनमध्ये हे हल्ले झाले आहेत.

नुकतेच बगदादमधील ग्रीन झोन येथील अमेरिकी दुतावासाजवळ दोन रॉकेटद्वारे हल्ला करण्यात आला होता. या ठिकाणी सरकारी इमारती आणि विविध देशांचे राजकीय दुतावास आहेत. इराणचा लष्करी कमांडर कासिम सुलेमानी याचा अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर या दोन्ही देशांमध्ये वाद सुरु झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three rockets hit US Embassy compound in Baghdad says US official