जगभरातील बळींची संख्या तीन हजारावर; चीनमध्ये मृतांची संख्या २,९८१

पीटीआय
गुरुवार, 5 मार्च 2020

मृत्यू

  • इटली - ७९
  • इराण - ७७
  • कोरिया - ३३
  • अमेरिका - ९
  • जपान - ६
  • फ्रान्स - ४
  • हाँगकाँग - २
  • स्पेन, थायलंड, ऑस्ट्रेलिया, तैवान, सान मरिनो आणि फिलिपाइन्स प्रत्येकी - १

बीजिंग - चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले होते. हजारो लोक मृत्युमुखी पडले तर तेवढ्याच लोकांना त्याची लागण झाली. मात्र चीनमध्ये ‘कोरोना’चा प्रभाव आता कमी झाला असल्याचे दिसत आहे. मृतांच्या अन रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

चीनमध्ये बुधवारी ३८ नवे रुग्ण आढळले तर मृतांचा आकडा दोन हजार ९८१ वर पोचला आहे, अशी माहिती चीनच्या आरोग्य विभागाने आज दिली. या जीवघेण्या आजारामुळे जगभरातील बळींची संख्या तीन हजार १२३ झाली असून संसर्ग झालेल्यांची संख्या ९१ हजार ७८३ आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three thousand victims worldwide In China the death toll stands at 2981