भारतावरचा धोका टळला; चीनची 'स्पेस लॅब' कोसळली प्रशांत महासागरात

वृत्तसंस्था
सोमवार, 2 एप्रिल 2018

याआधी अंतराळयानाशी संबंधित घटना
1967- सोयुझ 1 या अंतराळयानाचा पॅराशूट न उघडल्यामुळे एका अंतराळवीराचा यामध्ये मृत्यू झाला.
1986- STS-51-L थंड वातावरणामुळे अवघ्या 73 सेकंदातच हे अंतराळयान भरकटले आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे अंतराळयानाचा अर्धा भाग आजतागायत सापडलेला नाही.
2003-04- कोलंबिया अंतराळयान दोन आठवड्याच्या मिशननंतर परतीच्या मार्गावर थर्मल प्रोटेक्‍शन सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. 

बीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.

या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अखेर ही लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळली. यापूर्वी ती लॅब ऑस्ट्रेलियापासून अमेरिकेपर्यंत कोठेही कोसळू शकते, अशी शक्‍यता चीनच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मुंबई व महाराष्ट्रात कोठेही ही लॅब कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.   

'तियांगोंग-1' असे या अंतराळ स्थानकाचे नाव असून, त्याला चीनमध्ये "स्वर्गातील महाल' असेही संबोधले जाते. हे अंतराळ स्थानक रविवारी दुपारी पृथ्वीच्या वातावरणापासून सुमारे 179 किलोमीटर अंतरावर होते. 'तियांगोंग'ने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर त्याचे इंधन आणि अनेक भाग जळून खाक होतील. त्यामुळे अतिशय लहान अवशेष पृथ्वीवर कोसळले तरी त्यामुळे मोठे नुकसान होणार नाही. तसेच, पृथ्वीवर कोसळल्यानंतर कुठलेही विषारी पदार्थ तयार होणार नाहीत, असे चिनी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. दोन वर्षांच्या नियोजित सेवेनंतर 2013मध्ये या अंतराळ स्थानकाचा वापर थांबविण्यात आला होता. 

याआधी अंतराळयानाशी संबंधित घटना
1967- सोयुझ 1 या अंतराळयानाचा पॅराशूट न उघडल्यामुळे एका अंतराळवीराचा यामध्ये मृत्यू झाला.
1986- STS-51-L थंड वातावरणामुळे अवघ्या 73 सेकंदातच हे अंतराळयान भरकटले आणि मोठा स्फोट झाला. यामध्ये सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे अंतराळयानाचा अर्धा भाग आजतागायत सापडलेला नाही.
2003-04- कोलंबिया अंतराळयान दोन आठवड्याच्या मिशननंतर परतीच्या मार्गावर थर्मल प्रोटेक्‍शन सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने हा अपघात घडला. या अपघातात सात अंतराळवीरांचा मृत्यू झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiangong 1 Chinese Space Station Meets Fiery Doom Over South Pacific