उड्डाण घेताच विमानाने पेट घेतला, आगीच्या भडक्याने २५ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tibetian Airlines news

उड्डाण घेताच विमानाने पेट घेतला, आगीच्या भडक्याने २५ जण जखमी

चीनच्या सरकारी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार तिबेटीयन एअरलाईन्सच्या विमानाला टेक ऑफच्या वेळेस आग लागली होता. मात्र मोठा अपघात टळलाय. हे विमान चॉन्गकिंग वरुन तिबेटच्या ल्हासा येथे जाणार होते. मात्र लक्षात येताच रनवेवर उतरवण्यात आलं मात्र तोपर्यंत विमानाला आग लागली होती. टेकऑफ करत असताना हा अपघात हा अपघात झाला.

चीनच्या प्युपील्स वृत्तानुसार या विमानात एकूण ११३ प्रवासी आणि ९ क्रू मेंबर होते. सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आलंय. या अपघातात २५ प्रवासी जखमी झालेत त्यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय. या अपघाताचा एक व्हीडीओ व्हायरल झाला असून विमानाला धगधगती आग दिसतेय. टेकऑफच्या वेळेसच विमानातील क्रू मेमंबरला काहीतरी हिघाड झाल्ाचं लक्षात येताच, त्यांनी टेकऑफ रोखलं होतं तोपर्यंत विमान धावपट्टीवरुन खाली आले होते,आणि त्यात आग लागली

फ्यूजलेज म्हणजेच विमानाच्या मुख्य भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागताच, विमान लगेच धावपट्टीवर उतरवलं गेलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

Web Title: Tibet Airlines Plane Catches Fire During Take Off

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Tibet
go to top