
बीजिंग : तिबेटच्या शिगेझमधील डिंगरी काउंटीमध्ये काल झालेल्या भूकंपातील जीवितहानीबरोबरच वित्तहानीही मोठी झाली आहे. इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी १४ हजारहून अधिक कर्मचारी बुधवारीही बचावकार्य करीत होते. आतापर्यंत ४०० जणांना वाचविण्यात यश आले आहे.