esakal | टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

golfer tiger wood

जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स यांच्या कारला लॉस एंजिलिसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या कारमध्ये टायगर वूड्सला गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

टायगर वूड्स यांच्या कारचा भीषण अपघात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लॉस एंजिलिस - जगप्रसिद्ध गोल्फपटू टायगर वूड्स्स यांच्या कारला लॉस एंजिलिसमध्ये भीषण अपघात झाला आहे. या कारमध्ये टायगर वूड्सला गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त समोर येत आहे. असून प्रकृतीबद्दल अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

PGA चा गोल्फर्सचे एजंट, मार्क स्टेनबर्ग यांनी ग्लोबल न्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, वूड्स यांच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सर्जरी केली जाणार आहे. वूड्स यांच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याचंही त्यांनी सांगितले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

टायगर वूड्स हे रोलिंग हिल्स इस्टेट आणि रँचो पालोस वेरडेस इथं कारने जात होते. तेव्हा कार शेकडो फूट खाली कोसळली. यात कारचं मोठं नुकसान झालं असून वूड्स यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून सर्जरी केली जात आहे. वूड्स हे एकटेच कारमध्ये होते