आमचा ओरॅकलबरोबर करार पूर्ण : टिकटॉक

एएनआय
Monday, 21 September 2020

ओरॅकलबरोबर टिकटॉकचा करार झाल्याचे वृत्त आधीच प्रसिद्ध झाले होते, त्याला आज ‘बाइटडान्स’ने पुष्टी दिली.या करारामुळे अमेरिका सरकारला सुरक्षेबाबत वाटत असलेली काळजी मिटेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. 

बीजिंग - अमेरिकेतील आपले व्यवहार विकण्यासाठी ओरॅकल आणि वॉलमार्ट या कंपन्यांबरोबर करार झाला असल्याचे ‘टिकटॉक’ या ॲपची मालक कंपनी असलेल्या ‘बाइटडान्स’ने आज जाहीर केले आहे. ओरॅकलबरोबर टिकटॉकचा करार झाल्याचे वृत्त आधीच प्रसिद्ध झाले होते, त्याला आज ‘बाइटडान्स’ने पुष्टी दिली. या करारामुळे अमेरिका सरकारला सुरक्षेबाबत वाटत असलेली काळजी मिटेल, अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘बाइटडान्स’ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ओरॅकल आणि वॉलमार्ट या कंपन्या टिकटॉक ग्लोबल प्री आयपीओ फायनान्सिंगमध्ये सहभाग घेतील. या दोन्ही कंपन्या ‘बाइटडान्स’मधील वीस टक्के समभाग खरेदी करू शकतात. कंपनीच्या प्रस्तावानुसार, अमेरिकेतील सर्व युजरच्या डाटाची जबाबदारी ओरॅकल कंपनीची असेल आणि ते तंत्रज्ञानही पुरवतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामुळे अमेरिका सरकारला सुरक्षेबाबत असलेली काळजी  दूर होईल. व्यापारी भागीदारीसाठी वॉलमार्टबरोबर कंपनीची बोलणी सुरु आहे. याशिवाय, टिकटॉक अमेरिकेत आपला व्यवसाय वाढवून २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती करणार आहे. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TikTok deal with Walmart and Oracle