अमेरिकेच्या बंदीविरुद्ध टीकटॉक आव्हान देणार

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

आपल्या कंपनीला तसेच युझर्सना योग्य वागणूक मिळावी हे आमचे उद्देश आहेत. त्यासाठी आम्हाला न्यायालयीन यंत्रणेच्या माध्यमातून कार्यकारी आदेशाला आव्हान देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या बंदीच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय टीकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीने घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा शोधणे, ब्लॅकमेल करण्यासाठी विशिष्ट माहितीचे संकलन करणे, उद्योग जगतात हेरगिरी करणे अशा कारणांसाठी टीकटॉकचा वापर होण्याची शक्यता असल्याचा दावा करीत ट्रम्प यांनी टीकटॉकच्या अमेरिकेतील व्यवहारांवर बंदी घातली आहे. कोरोनाच्या जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत. यामुळे टीकटॉककडून चीन सरकारला माहिती पुरविली जाऊ शकते असा ट्रम्प यांचा दावा आहे. सहा ऑगस्ट रोजी त्यांनी जारी केलेल्या कार्यकारी आदेशानुसार बाईटडान्स कंपनीबरोबरील व्यवहार ४५ दिवसांच्या आत थांबवावेत असे बजावण्यात आले आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेला धोका असण्याचे कारण दिले आहे. टीकटॉकतर्पे मात्र याचा वारंवार इन्कार करण्यात आला आहे. त्यांच्यावतीने एक निवेदन जारी करण्यात आले. त्यानुसार कायद्यानुसार दाद मागण्याचा नियम झुगारला जाऊ नये, आपल्या कंपनीला तसेच युझर्सना योग्य वागणूक मिळावी हे आमचे उद्देश आहेत. त्यासाठी आम्हाला न्यायालयीन यंत्रणेच्या माध्यमातून कार्यकारी आदेशाला आव्हान देण्याशिवाय कोणताही पर्याय नाही.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiktok-owned ByteDance has decided to challenge the ban imposed by US