"आजचा काळ हा युद्धाचा नाही"; पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान मोदींनी मांडली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Modi_Putin

"आजचा काळ हा युद्धाचा नाही"; पुतिन यांच्याशी भेटीदरम्यान मोदींनी मांडली भूमिका

नवी दिल्ली : आजचा काळ युद्धाचा नाही, येणाऱ्या काळात शांततेच्या मर्गावर आपल्याला पुढे जावं लागेल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उझबेकिस्तानातील समरकंद इथं सुरु असलेल्या एसओएस समिटमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान मोदींनी आपली भूमिका मांडली. (Today is not a time of war PM Modi expressed his sentiments during meeting with Putin)

यावेळी मोदी म्हणाले, "मला रशिया आणि युक्रेनचे आभार मानायचे आहेत. कारण युद्धाच्या संकटकाळात सुरुवातीला आमचे हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले होते. तुम्हा दोन्ही देशांमुळं त्यांना सुखरुप भारतात आणण्यात आलं. मला जाणीव आहे की आजचा काळ हा युद्धाचा नाही. यापूर्वीही फोनवरुन मी तुमच्यासोबत अनेकदा लोकशाही, रणनीती तसेच संवाद यावर चर्चा केली आहे. या सर्व गोष्टी जगाला स्पर्शून जातात. त्यामुळं येणाऱ्या काळात शांततेच्या मार्गावरुन आपण कसे पुढे जाऊ यावर आपण चर्चा करायला हवी. याबाबतचा आपला दृष्टीकोन जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे"

हेही वाचा: राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान? कोणाला डच्चू?

दरम्यान, भारत आणि रशियाचे संबंध अनेक पटीनं वाढले आहेत. आपण कायमच असे मित्र राहिलो आहोत जे गेल्या अनेक देशकांपासून एकमेकासोबत आहेत. व्यक्तीगत स्वरुपात सांगतो की आपल्या दोघांचा प्रवास एकत्रच सुरु झाला. आजची आपली भेट आणि चर्चा ही येणाऱ्या काळातील आपले संबंध अधिक गहिरे करतील आणि जगातील समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरेल अशी मला आशा वाटते, अशा शब्दांत पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे आभार मानले.

अन्न, तेल, खतांच्या सुरक्षेची जगाला सध्या चिंता

"डिसेंबरमध्ये तुम्ही भारतात आला होतात तेव्हा अनेक विषयांवर आपली चर्चा झाली होती. त्यानंतर आज पुन्हा आपली भेट होत आहे. जगासमोर विशेषतः विकसीत देशांसमोर आज सर्वात मोठी चिंता आहे ती अन्न, तेल आणि खतांच्या संरक्षणाची. आपल्याला यामध्ये जरुर मार्ग काढावे लागतील तुम्हालाही यासाठी उपाय शोधावे लागतील, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Web Title: Today Is Not A Time Of War Pm Modi Expressed His Sentiments During Meeting With Putin

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..