Imran Khan : न्यायालयात साक्ष नोंदवताना माझी हत्‍या होईल; माजी पंतप्रधानानं व्‍यक्‍त केली भीती

निवडणूक आयोगानं (Election Commission) याप्रकरणी इम्रान यांना दोषी घोषित केलंय.
Toshakhana Case Imran Khan
Toshakhana Case Imran Khanesakal
Summary

2018 मध्‍ये पाकिस्‍तानमध्‍ये इम्रान खान यांचे सरकार सत्तेवर आले. या काळात त्‍यांना अरब शासकांकडून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या (Pakistan) पंतप्रधानपदी असताना विदेशी राजकीय नेत्यांकडून मिळालेल्या सरकारी भेटी वैयक्तिक स्वार्थासाठी विकल्याप्रकरणी न्यायालयानं इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेचा आदेश दिला होता.

निवडणूक आयोगानं (Election Commission) याप्रकरणी इम्रान यांना दोषी घोषित केलंय. आता या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. इम्रान यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला. आताही पोलीस आणि समर्थक यांच्यात झटापट सुरू आहे.

दरम्यान, तोशाखान प्रकरणी (Toshakhana Case) न्यायालयात साक्ष नोंदवताना माझी हत्‍या होऊ शकते, अशी भीती पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान व तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी व्‍यक्‍त केलीये. त्‍यांनी यासंदर्भात एक ट्विट केलंय.

Toshakhana Case Imran Khan
Fumio Kishida : PM मोदींच्या भेटीनंतर जपानचे पंतप्रधान अचानक भारतातून युक्रेनला रवाना; नेमकं काय झालं?

पाकिस्‍तान सरकारनं इम्रान खान यांच्‍यावर विविध गुन्‍हे दाखल केले आहेत. तोशाखान प्रकरणी ते शनिवारी सुनावणीकरिता इस्‍लामाबाद न्‍यायालयात उपस्थित राहिले होते. यानंतर त्‍यांनी ट्विट करत माझी हत्या होऊ शकते, असं म्‍हटलं आहे.

Toshakhana Case Imran Khan
Politics : काँग्रेस पुन्हा मोठा प्रयोग करण्याच्या तयारीत; 'या' नेत्यावर सोपवणार अध्यक्षपदाची जबाबदारी!

या प्रकरणी न्‍यायालयानं व्हर्चुअल (आभासी) पद्धतीनं सुनावणी घ्‍यावी, अशी विनंतीही इम्रान खान यांनी केलीये. तसंच त्‍यांनी पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अत्ता बंदियाल यांना एक पत्र लिहून त्यांच्यावरील खटल्यांबाबत माहिती देत मदत मागितली असल्‍याचं वृत्त पाकिस्‍तानमधील माध्‍यमांनी दिलं आहे. दरम्यान, न्यायालयानं त्यांच्या अटकेवर तात्पुरती स्थगिती आणत त्यांना दिलासा दिला. पण, दरम्यानच्या काळात त्यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालण्यात येणार अशा चर्चा सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com