Xi Jinping : व्यापारयुद्धामुळे कोणाचाच फायदा होणार नाही; जिनपिंग यांची भूमिका

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध भडकले असल्याच्या पार्श्चभूमीवर जिनपिंग यांचा हा लेख झाला प्रसिद्ध.
Xi jinping
Xi jinpingsakal
Updated on

हनोई - ‘व्यापारयुद्धामुळे कोणाचाच फायदा होणार नाही. आपण बहुस्तरीय व्यापार पद्धत आणि पुरवठा साखळी यांचे संरक्षण करत एकमेकांना सहकार्य करायला हवे,’ अशी भूमिका चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज एका लेखाद्वारे स्पष्ट केली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध भडकले असल्याच्या पार्श्चभूमीवर जिनपिंग यांचा हा लेख प्रसिद्ध झाला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापारयुद्धातून बहुतांश देशांना तात्पुरती सवलत दिली असली तरी चीनवरील १४५ टक्के आयातशुल्क कायम ठेवले आहे. अमेरिकेबरोबरील तणाव वाढला असतानाच जिनपिंग यांनी आग्नेय आशियाच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जिनपिंग हे आज व्हिएतनाम येथे दाखल झाले. यानिमित्ताने त्यांनी चीन आणि व्हिएतनाममधील सरकारी वृत्तपत्रांमध्ये विशेष लेख लिहीत भूमिका स्पष्ट केली आहे. ‘व्यापार किंवा आयातशुल्क युद्धात कोणीही विजेता ठरत नाही. त्यामुळेच चीन आणि व्हिएतनामने बहुस्तरीय व्यापार पद्धतीचे आणि पुरवठा साखळीचे संरक्षण करत एकमेकांना सहकार्य करायला हवे.

जगाने सर्वंकष आणि सर्वसमावेशक आर्थिक जागतिकीकरणाच्या दिशेने वाटचाल करायला हवी. एकांगी आणि स्वार्थी व्यापाराच्या या काळात चीन हा जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. आम्ही जगासाठी नवीन संधी निर्माण करू आणि उच्च दर्जाच्या विकासात आमचे योगदान देऊ,’ असे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

नवा पर्याय...

अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापारयुद्धामुळे चीन इतर देशांबरोबर सहकार्य वाढवून आणि समांतर पुरवठा साखळी निर्माण करत मोठे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे आग्नेय आशियातील देशही धास्तावले असल्याने जिनपिंग हे त्यांच्यासमोर नवा पर्याय म्हणून सामोरे जात असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले. व्हिएतनाम हा चीनप्रमाणेच साम्यवादी देश आहे. आतापर्यंत या देशाने समतोल राखला असला तरी व्यापारयुद्धामुळे हा देश चीनकडे झुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com