
वॉशिंग्टन : कोरोनाचा विषाणू २०१९मध्ये चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेतूनच जगात सर्वत्र पसरला असल्याचा दावा ट्रम्प प्रशासनातर्फे केला जात आहे. कोरोना विषाणूचा उगम या प्रयोगशाळेतूनच झाल्याच्या गृहितकाला बळकटी आणणारा तपास करण्यास अमेरिकेत सुरुवात करण्यात आली आहे. तसेच, पूर्वीच्या सरकारने राजकीय कारणासाठी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले असा आरोप करत सरकारने माजी आरोग्य अधिकारी आणि तपास संस्थांवरही टीका केली आहे.