Trump South Africa Conflict : ट्रम्प पुन्हा भडकले; दक्षिण आफ्रिकेच्या अध्यक्षांशी वाद
TrumpVsRamaphosa : श्वेतवर्णीय शेतकऱ्यांवरील कथित अत्याचाराच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामफोसा यांच्यात माध्यमांसमोर वाद झाला. ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेतील मदत थांबवल्याचेही जाहीर केले.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सीरिल रामफोसा यांच्यात माध्यमांसमोर बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला आहे. श्वेतवर्णीय शेतकऱ्यांच्या नरसंहारावरून ट्रम्प यांनी माध्यमांसमोरच रामफोसा यांच्याशी वाद घातला.