
वॉशिंग्टन : अंदाजे डझनभर देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली असल्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. अफगाणिस्तान, बर्मा, काँगो, चाड, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लीबिया, सोमालिया, सुदान, येमेन या देशातील नागरिकांना येत्या सोमवारपासून अमेरिकेत प्रवेशबंदी असेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लियोन, टोगो, तुर्कमेनिस्तान, व्हेनेझुएला या देशातील नागरिकांवरही अधिक कठोर निर्बंध असतील, असे सांगण्यात आले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी या देशातील नागरिकांवर बंदी घालण्यात येत असल्याचे अध्यक्षट्रम्प यांनी म्हटले आहे.