
न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज गाझा पट्टी ताब्यात घेण्याची धक्कादायक घोषणा केली. आम्ही युद्धग्रस्त गाझा पट्टी ताब्यात घेऊ, या भागाची जबाबदारी स्वीकारून तिचा विकास करू, जेणेकरून येथील लोकांना रोजगार निर्माण होईल, असे ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ट्रम्प यांच्या या विधानावर सौदी अरेबियासह युरोपमधील मित्रदेशांनीही आक्षेप घेतला असून अशा प्रकारच्या कृतीला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.