esakal | चीन-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका
sakal

बोलून बातमी शोधा

Trump ends Hong Kong preferential status

चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला एक दणका दिला असून हाँगकाँगवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

चीन-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र; डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनला दणका

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष काही केल्या कमी होताना दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला एक दणका दिला असून हाँगकाँगवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्यांना व्यापार करण्यासाठी दिलेला विशेष दर्जाही काढून घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँगमध्ये चाललेल्या हिंसाचाराला चीनला जबाबदार ठरवत त्यांनी या आदेशांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यासोबत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी या कायद्याद्वारे हाँगकाँगमध्ये होत असलेला अन्याय आणि हिंसाचारावर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचे सांगितले आहे. आता अमेरिका हाँगकाँगसोबतही मुख्य चीनप्रमाणेच वागणार आहे. नुकतेच चीनने हाँगकाँगमध्ये काही स्वतःचे कायदे लागू केले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ही पावले उचलण्यात आली आहेत.

न्यूज एजन्सी एएफपीच्या बातमीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, हाँग काँगसोबतचे व्यवहार आता मुख्य चीनप्रमाणे राहतील. त्यांना कुठल्याही प्रकारचा विशेष दर्जा किंवा कुठल्याही प्रकारची विशेष सुविधा राहणार नाही, हाँगकाँग आता स्वतंत्र नसून तो चीनच्या अधिपत्याखाली आला आहे. हाँगकाँगकडे आता कुठल्याही प्रकारचे अधिकार राहिलेले नाहीत. आता हाँगकाँगमधील अनेक लोक देश सोडतील असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनने कायम अमेरिकेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला पण, बदल्यात अमेरिकेला काहीच मिळाले नाही असेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी म्हणाले.

ट्रम्प म्हणाले, हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्यावरही आपण स्वाक्षऱ्या केल्या आहेत. जो कायदा या महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकी संसदेत पारित झाला आहे. हा कायदा हाँगकाँगच्या स्वायत्तता कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर निर्बंध घालण्याच्या अधिकार देतो. एवढंच नाहीतर हा कायदा बँकावरही निर्बंध घालू शकतो. तसेच हा कायदा हाँगकाँगचे स्वातंत्र्य हिसकावणारांच्या विरोधात कठोर निर्णय घेणारा ठरेल असेही ते म्हणाले.