
वॉशिंग्टन : कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनामध्ये देशाला आघाडीवर नेण्याच्या दृष्टीने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय ऊर्जावर्चस्व परिषदेची स्थापना केली आहे. या परिषदेच्या स्थापनेच्या कार्यकारी आदेशावर सह्या करतानाच, तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.